Monday, 20 March 2017

Gudi Padwa 2017

गुढीपाडवा २०१७ पंचांग (Gudi Padwa 2017 Date)
गुढीपाडव्यापासून, नवीन शालिवाहन शकवर्षारंभापासून नवीन पंचांगाची सुरुवात होते. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कातिर्क, मार्गशीर्ष, पौष, माघ फाल्गुन हे चांद-महिने एकामागोमाग येत असतात. भारतीय कालमापनात ऋतू सण यांनी सांगड घातलेली आहे. त्यासाठी सौर चांदपद्धतीचा मेळ घातलेला आहे. महिन्यांची नावे आकाश यांचाही संबंध आहे. चैत्र महिन्यात चित्रा नक्षत्र रात्रीच्याप्रारंभी पूवेर्ला उगवून पहाटे पश्चिमेस मावळते. वैशाख महिन्यात विशाखा! ज्येष्ठात ज्येष्ठा! तसेच त्या महिन्यांच्या पौणिर्मेला चंद त्या त्या नक्षत्रापाशी असतो. म्हणजे चैत्र पौणिर्मेला चंद चित्रापाशी! जानेवारी-फेब्रुवारीचे तसे नसते.
Gudi Padwa 2017 

         येत्या मंगळवारी पाडव्याला म्हणजेच २८ मार्च २०१७ ला  सुर्योदय सकाळी ०६.३७ मिनिटाला सुर्यास्त सायंकाळी १८.५० मिनिटाला आहे. फाल्गुन आमावस्या प्रारंभ सोमवार २७ मार्च सकाळी १०.४४ मिनिटाला समाप्ती मंगळवार २७ मार्च सकाळी ०८.२७ मिनिटाला आहे.  
        अशा या सणाला हिंदूंच्या जीवनात विशेष महत्त्व आहे. सूर्योदयाच्या वेळी प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असल्यामुळे सूर्योदयानंतर ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी ! गुढीपाडव्याच्या दिवशी तेज प्रजापति लहरी मोठ्या प्रमाणात कार्यरत असतात. सूर्योदयाच्या वेळी या लहरींतून प्रक्षेपित होणारे चैतन्य खूप वेळ टिकणारे असते. ते जिवाच्या पेशींत साठवून ठेवले जाते आवश्यकतेनुसार त्या जिवाकडून ते वापरले जाते. त्यामुळे सूर्योदयानंतर ते १० मिनिटांत गुढीची पूजा करावी. या पाडव्याला एकमेकास सहकार्य करण्याचे आपल्या आसपासचा परिसर स्वछ ठेवण्याचा संकल्प करू.
                                           नक्षीदार काठावरी रेशमी वस्त्र,
                                            त्याच्यावर चांदीचा लोटा ,
                                            उभारुणी मराठी मनाची गुढी,
                                             साजरा करूया हा गुढीपाडवा,

                                           गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा....