Sunday, 19 March 2017

Gudipadwa Celebration




गुढीपाडवा (GudiPadwa)



गुढीपाडवा हा हिन्दूधर्मातील वर्षाचा पहिला सण नुतन वर्षाचा पहिला दिवस मानला जातो. ब्रह्मदेववाने सृष्टीची निर्मिती यादिवशीकेली. अशा या सणाला विशेष महत्व आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्त मानला जातो. साडेतीन मुहूर्त म्हणजे,या दिवशी शुभवेळ बघावी लागत नाही. पूर्ण दिवस हा शुभ असतो म्हणूनच या दिवशी लोक आपआपल्या जीवनातील नवीन प्रकल्प सुरु करतात. जसे नवीन घरात प्रवेश करणे,गाडी घेणे या दिवशी अभ्यंग स्नान करणे दाराला तोरण लावणे पूजा करणे त्याचबरोबर घरोघरी गुडी उभारून हा सन साजरा केला जातो.
चैत्र शुक्ल पक्षाच्या प्रथम दिवशी गुढी पाडव्याला प्रभू श्री राम सपत्नीक आपल्या सर्व दलासमवेत अयोध्येला 14 वर्षांचा वनवास संपवून परत आले होते. त्या रावणावरच्या अतुलनीय विजयाचे कौतुक म्हणून रावणाच्या त्रासातून मुक्त झालेल्यांनी, प्रभू श्री राम आपल्या घरी परत आल्यामुळे आनंदीत झालेल्या नगर जनांनी, आपल्या आनंदाच्या प्रित्यर्थ गुढ्या उभ्या केल्या. आपली घरेदारे सजवली सोन्यामाणकांसारख्या वैभवसंपन्न रत्नांनी पूर्ण अयोध्या सजली होती. 



                              गुढी कशी उभारली जाते


सर्वप्रथम घराबाहेर बांबूची काठी लावली जाते बांबूच्या टोकाला साडी बांधली जाते साडी बांधल्यानंतर त्या बांबूच्या  टोकावर कलश उपडा ठेवला जातो. त्यावर लिंबाची पाने फुलांच्या हाराने  गुढी सजवली जाते. तसेच साखरेची माळ लावली जाते. शेवटी पूजा केली जाते. आणि पूजा झाल्यावर साखर आणि लिंबाची पाने एकत्र करून प्रसाद म्हणून वाटलं जातो.


  गुढी सजवण्याची पद्धत



सर्वप्रथम बांबू पाण्याने स्वच्छ धुऊन कोरड्या कापडाने पुसावा. नंतर पिवळ्या वस्त्राच्या मिऱ्या कराव्यात मिऱ्या केलेले वस्त्र बांबूच्या टोकावर बांधावे. त्यावर कडुलिंबाची कोवळी पाने,आणि फुलोरा असलेली डहाळी बांधावी. नंतर त्यावर साखरेची गाठी म्हणजे साखरेची माळ बांधावी. त्यावर फुलांचा हार घालावा कलशावर कुंकवाच्या पाच रेषा ओढाव्यात कलश बांबूच्या  टोकावर उलटा ठेवावा हि गुढी एका लहानशा पाटावर उभी करावी. तिला आधारासाठी दोरीने बांधावे.


गुढी पूजनाची कृती

गुढीची पूजा करण्यासाठी प्रथम पाटावर बसावे. प्रथम आचमन करतात त्यानंतर प्राणायाम करतात .त्यानंतर कथन करतात गणपती पूजन करतात त्यानंतर कलश घंटा आणि दीपपूजन करतात तुळशीच्या पानांनी संभार प्रोक्षण करतात म्हणजेच पूजा सामग्री आसपासची जागा आणि स्वतःला तुळशीपत्राने जल शिपंडतात यानंतर ब्रम्हध्व जायनमःहा  या मंत्राचे उचारन करून गुढीपूजन सुरु करतात. त्यानंतर हळदी कुंकू वाहतात त्यानंतर अक्षदा वाहतात. नंतर फुले वाहतात त्यानंतर उदबत्ती दाखवतात. दीप दाखवतात नंतर नैवेद्य दाखवतात पूजनानंतर कुटुंबियांसहित प्रार्थना करतात प्रार्थनेनंतर गुढीला दाखवलेला कडुलिंबाच्या पानांचा प्रसाद सर्वाना वाटतात आणि स्वतःही ग्रहण करतात
गुढी उतरवण्याची पद्धत - सूर्यास्तानंतर लगेचच गुढी खाली उतरवावी गुढी खाली उतरवताना कुटुंबप्रमुखाने गुढीला हळद कुंकू वाहावे. त्यानंतर गुढीला नमस्कार करावा. गुढीला गुळाचा  नैवेद्य दाखवावा. त्यानंतर सर्वानी प्रार्थना करावी. गुढिला अर्पण केलेली फुले आणि पाने वाहत्या पाण्यात विसर्जित करावी

 सन उत्सवांची उपयोगिता

भारतीय संस्कृतीचा उद्देश व्यक्तीला त्याद्वारे समाजाला धर्म परायण कर्तव्यनिष्ठ बनविणे हा आहे. म्हणून आमच्या प्राचीन संस्कृतीचे सर्व अदर्श विधी-विधान असे बनविण्यात आले आहेत कि त्याद्वारे मनुष्याच्या भौतिक उन्नती सोबत त्याची मानसिक आध्यत्मिक उन्नती सुद्धा होईल.धर्म अध्यात्मिकतेची  भावना वाढण्यासोबतच मनुष्यात सामूहिकतेची भावनासुद्धा वाढावी. हा एक उद्देश्यसुद्धा या धार्मिक सामाजिक उत्सवांचा आहे
मानवी जीवन यशस्वी होण्याकरिता ज्याप्रमाणे उन्नतीची सत्प्रवृतींना धारण करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे सामाजिक संघटनेला मजबूत करने सहकार्याने समाज हिताच्या योजना राबवणेसुद्धा आवश्यक आहे. याकरिता लोकांमध्ये पारंपरिक बंधुभाव निर्माण होणे गरजेचे आहे. आमच्यायेथे होळी,गुढीपाडवा,दिवाळी, दसरा तीर्थस्नान यासारखे सन उत्सव याच उद्देश्याकरिता योजिण्यात आले आहेत. जेणेकरून लोक एकदुसऱ्यांशी प्रेमाने भेटतील सामूहिकतेची भावना दृढ होईल. हिंदू -ऋषी- मुनींनी सन,उत्सव,व्रत,जत्रा याद्वारे जीवनाला रसमय सुंदर बनवण्यासाठी योजना ठेवली आहे. या प्रत्येकांचे एक माहात्म्य आहे आणि प्रत्येकांशी भारतीयसंस्कृतीतील महत्वाचे तत्व जुळलेले आहेत. यामागील एक विचार ऋतू बदलाचासुद्धा आहे.  
भारतीय संस्कृतीत निसर्गाने सहचर्य विशेष महत्व ठेवते. ऋतूमध्ये होणारा प्रत्येक बदल हा आपल्यासोबत काही विशेष संदेश घेऊन येत असतो. त्याचे आमच्या शेतीमध्येसुद्धा महत्वाचे स्थान असते. कृषीप्रधान देश असल्यामुळे हा बदल अम्हासाठी हसण्या-खेळण्याचा,मनोरंजनाचा क्षण तर असतोच शिवाय प्रत्येकाची आपआपली उपयोगितासुद्धा आहेच. सणांची योजना अशाच क्षणी करण्यात आली आहे  जी योग्य आहे. या उद्देशाच्या दृष्टीने या सणांना दोन भागात विभागल्या जाऊ शकते. पहिल्या श्रेणीत ते सन येतात ते सांस्कृतिक आहेत आणि त्यांचा उद्देश्य भारतीय संस्कृतीच्या मूळ तत्वांचे विचारांचे रक्षण करणे आहे. यात हिंदूंचे सर्व मोठ-मोठे सण येतात.जसे होळी,गुढीपाडवा,दिवाळी,दसरा,वसंत पर्व रक्षाबंधन संक्रात इत्यादी.संस्कृतीचे रक्षण हाच यांचा आत्मा आहे
दुसऱ्या श्रेणीत ते सन येतात ज्यांना काही महापुरुषांच्या स्मृतीनिमित्त बनविण्यात आले आहेत. त्या महापुरुषांच्या अवतार पुरुषांच्या गुणांना,पवित्र चारित्र्याला महानतेला लक्षात ठेवण्याआधीच त्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यात रामनवमी कृष्ण जन्माष्टमी,हनुमान जयंती असे सण येतात
दोन्ही श्रेणीत मुख्य विशेषतः हीच आहे कि लोकं संसार सागरात बुडू नयेत,किंवा त्यांचे जीवन निरस. चिंताग्रस्त भारस्वरूप होऊ नये त्यांना ईश्वराच्या दिव्य शक्ती अतुल्या सामर्थ्याविषयी चितन, मनन स्वाध्याय करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा. सण,उत्सव हे नेहमीच काही ना काही प्रमाणात बदलत असतात आणि त्यांना साजरे करण्याच्या पद्धतीत आजसुद्धा प्रत्येक प्रदेशात काही ना काही वेगळेपणा आहेहजार दोनहजार वर्षांची गोष्ट तर सोडाच,आजपासून पाच-सातशे वर्षा आधीच्या साहित्याचा ऐतिहासिक ग्रंथाचा शोध घेतल्यास असे आढळून येते कि त्यावेळचे बरेचसे सण आज समाप्त झाले आहेत आणि कितीतरी नवे प्रचलित झाले आहेत

* Gudi Padwa information in Marathi Language

गुढीपाडवा कथा


एक दुष्ट राजा होता ज्याचे नाव बाली होते तो आपल्या प्रजेवर खुप जुलूम आणि अंन्याय करत होता . प्रजा बालीच्या त्रासाने खूप त्रस्त झाली होती. प्रभू श्री रामाने बालीसोबत युद्ध करून बालीला हरवले आणि प्रजेला त्याच्या त्रासापासून मुक्त केले. अर्थात बालीला हरवुन त्यावर विजय मिळवला तो विजयउत्सव श्री रामाचा विजयउत्सव त्यामुळे हा गुडीपाडवा सन साजरा केला जातो.
श्री राम विजयी होऊन आल्यानंतर त्यांच्या आयोध्या नागरीमध्ये सर्वांनी विजयोत्सव साजरा केला. कारण खूप गुलामी राजापासून त्यांची मुक्ती झाली होती आणि प्रत्येकाने आपापल्या घराबाहेर विजयाचे निशाण स्वरूप गुढीला एक कापड बांधून विजयोत्सव साजरा केला,त्यावर कडुनिंबाची पाने साखरेची माळ हार तांब्याचे भांडे ह्याप्रकारे गुढी सजवली हे सर्व का ठेवले गेले कि जीवनात कडुनिंबाच्या पानासारखा कडूपणा आहे तो नाहीसा झाला पाहिजे आणि गुळामध्ये जो गोडवा आहे तसा गोडवा आपल्या जीवनामध्ये यावा आपण आपल्यामध्ये तो गोडवा भरावा त्याचप्रकारे जीवनामध्ये  येणाऱ्या अडचणींवर मात करून स्वतःवर विजय प्राप्त करूया. ज्याप्रकारे प्रभू श्री रामाने विजय मिळविलातो एक आपल्याला विजय मिळविण्याची शक्ती देत आहे. आणि आपल्यांमध्ये आत्मविस्वास जागृत करत आहे.




गुढीपाडवा या दिवशी कडुनिंबाचे महत्व




हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा. पुराणांप्रमाणे ब्रम्हदेवाने हे जग चैत्र शुल्क प्रतिपदेच्या दिवशी निर्माण केले आहे. तसेच गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तातील एक सण मानला जातो.गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरासमोर गुढी उभारली जाते. बांबूच्या टोकाला तांबडे जरीचे वस्त्र, साखरेची माळ, फुलांची माळ, कडुनिंबाचे पाने लावून त्यावर तांब्याचा लोटा ठेवला जातो. दारासमोर रांगोळी घालून अशी तयार केलेली गुढी उभी केली जाते.या दिवशी कडुनिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेच या दिवशी कुडुनिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे
कडुनिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातोतसेच कोवळ्या पानांमध्ये चण्याची भिजवलेली डाळ, जिरे, ओवा, हिंग, चिंच, गूळ, मीठ इत्यादी मिसळून चटणी तयार केली जाते. याचे भक्षण केल्याने शरीरात शक्तीचे कण पसरतात. शरीराला कार्य करण्यासाठी ऊर्जा प्राप्त होते. म्हणून केवळ या दिवशी कडुनिंबाचे सेवन करायचे असे नसून या दिवसापासून वर्षभर याची आठवण राहावी हे सुचविले आहेतकडुनिंबाची पाने, फुले, फळे, मुळे आणि खोड अशा पाच अंगांचा उपयोग होतो. पाने कडू लागतं असली तरी आपल्या गुणांमुळे गुढीपाडव्याच्या दिवशी याचे सेवन केलं जातं. याने पोटातील जंत दूर होण्यास मदत मिळते
कडुनिंबाने अंगावर उठणारी खाज इतर त्वचेसंबंधी तक्रारी दूर होतात. तसेच वर्षभर कडुनिंब खाणे शक्य नसल्यास केवळ गुडीपाडव्यापासून दोन महिनेही याचे नियमित सेवन केले तरी वर्षभर याचा लाभ होतो.एकूण आरोग्याच्या दृष्टीने कडुनिंबाचे सेवन करणे योग्यच आहे. याने रोगराई दूर होते आणि शरीर निरोगी राहते.



गुढीपाडवा या दिवशी पुरणपोळी करतात  

              पुरणपोळी कशी करावी





साहित्य

 वाट्या हरभरा डाळ,
 वाट्या किसलेला गूळ,
 वाटी साखर
अर्धे जायफळ
 ते  वेलदोडे,
 वाट्या कणीक
 टे.स्पून मैदा,  चिमुटभर  मीठ,  पाऊन  वाटी  तेल,  तांदळाची पिठी.

   कृती
हरभरा  डाळ स्वच्छ  निवडून  धुवून घ्यावी. प्रेशर  कुकरमध्ये  हरभरा  डाळ  शिजवून  घ्यावी.शिजलेली  डाळ चाळणीवर  उपसून  पाणी  काढून  घेणे. ह्या  पाण्याला  पुरणाचा  कट  म्हणतात.  
पुरणपोळी बरोबर त्याचीच  आमटी  करतात.  पुरणाचा  कट  काढल्याने  पोळी  हलकी  होते.डाळ  एका  जाड बुडाच्या  पातेल्यात  घालून  थोडी  डावाने  घोटावी.  त्यात  गूळ    साखर  घालून  शिजवायला  ठेवावी.पुरण चांगले  शिजले  की  पातेल्याच्या  कडेने  सुटू  लागते.  शिजवताना  प्रथम  पातळ  होते    नंतर  झाऱ्याला घट्ट  लागू लागते.
पुरणयंत्राला  बारीक  जाळीची  ताटली  लावावी    शिजलेले  पुरण  गॅसवरून  उतरवून त्यात  जायफळ, वेलदोडे पूड  घालून गरम  असताना  पुरणयंत्रातून  वाटून  घ्यावे.
कणीक मैदा  चाळणीने चाळून  घ्यावा    चिमुटभर   मीठ,  पाव  वाटी  तेल  टाकून  कणीक  सैलसर भिजवावीदोन तास  कणीक भिजल्यावर  परातीत  काढून  पाणी  लावून  हाताने  चांगली  तिंबावी. पाण्याबरोबर  वारंवार  तेलाचा वापर करावा.  कणीक  चांगली  मळून  सैल  झाली  पाहिजे
वाटलेले  पुरण  हाताने  सारखे  करून  घ्यावे. तांदळाची पिठी  हाताला  लावून  कणकेचा  छोटा  गोळा हातावर घ्यावा. साधारण  कणकेच्या  गोळ्याच्या दुपटीपेक्षा जास्त पुरण घेवून हलक्या हाताने ते हळूहळू कणकेत भरावे उंडा हाताने बंद करावा, पोळपाटावर  पिठी घेवून हलक्या  हाताने  पोळी  लाटावी    मंद  आचेवर तव्यावर  गुलाबी  सारखे  डाग  पडेपर्यंत भाजावी. ह्याच रीतीने  सर्व  पोळ्या  कराव्यात.


गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा  !!!
  





No comments:

Post a Comment